उत्तरहिंद मराठे
उत्तरहिंद मराठे भाग : - ०१ १८ व्या शतकातील अफगाणिस्तान. अरबी , दारी , पश्तो बोलणाऱ्या पठाणांचा , आणि टोळधाडी करणाऱ्या लुटारूंचा भरणा असलेला प्रदेश नादिरशहाच्या नेतृत्वाखाली या पठाणांनी पुर्वेकडील सुबत्ता पहिल्यांदा पाहिली होती. वेळ मिळेल तेव्हा ती ओरबाडली होती. पाच नद्यांच्या ईश्वरी आशिर्वादाने सधन झालेला पंजाब आणि त्याच्या शेजारी असलेल्या सरहिंदच्या प्रांताला जणू एखादा शाप मिळावा तशा या टोळ्या मनमुरादपणे येऊन लूट करू लागल्या. नादिरशहाच्या मृत्यूनंतर अब्दालीने सर्व पठाणांना एकत्र करून काबुल येथे स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. मुळात पंजाब व सरहिंदच्या प्रांतातले शिख हे कडवे शिपाई. तलवारीला देव माननारे. पण या रोजच्या जाचाला तेही कंटाळले होते. याचा काहीतरी बंदोबस्त करणे आवश्यक होते. अहत तंजावर ते तहत पेशावर. ही स्थिती खरोखर त्या काळत होती. १७५८ साली मराठे अटकेपार पोहोचले होते. रघुनाथरावांच्या नेतृत्वाखाली मराठी सीमा थेट अफगाणिस्तानाच्या सिमेपर्यंत जाऊन भिडल्या होत्या. " हर हर महादेव " चा जयघोष अफगाणिस्तानापर्यंत जाऊन भिडला. अफगाणिस्तान चा वृक्ष प्रदेश पाह