विसाव्या शतकातील घडामोडी.

विसाव्या शतकातील घडामोडी  

भाग : - ०१ 

जगात अनेक युद्धे झाली. त्यातही महत्त्वपूर्ण ठरतात ती विसाव्या शतकातील युद्ध. यात प्रामुख्याने अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. युरोपाच्या राजकारणात १८७० नंतर काही असे बदल झाले की त्याचा उद्रेक पहिल्या महायुद्धात रुपांतरीत झाला. पहिल्या महायुद्धानंतर सर्व विजेत्या राष्ट्रांनी युद्धाला सर्वस्वी जर्मनीच जबाबदार आहे असे म्हटले. पण या महायुद्धाला एकटीच जर्मनी जबाबदार नव्हती. पहिल्या महायुद्धात जर्मनीचा अर्थातच बिस्मार्क चा दोष हाच की त्याने १८७१ साली जर्मनीचे एकीकरण पुर्ण केले आणि करता करता फ्रान्स चे अल्सेस व लॉरेन्स हे प्रदेश बळकावले. 
     यानंतर जे घडले त्यात जर्मनीचा काहीच दोष नव्हता. १८७१ नंतर फ्रान्स मधील जनमत खवळून उठले. प्रत्येक फ्रेंच नागरिकाला जर्मनीची राख व्हावी असे वाटू लागले. फ्रेंच वृत्तपत्रांनी हा प्रश्न खुपच पेटवला. यानंतर १८९० नंतर युरोपात बाल्कन राष्ट्रांचे युद्ध पेटले. पहिल्या महायुद्धाला बाल्कन राष्ट्रांचे दुसरे युद्ध म्हणतात. जर्मनीने  बेल्जियम वर आक्रमक केले आणि महायुद्धाचा भडका उडला. पण त्याआधीही काही घडना घडल्या त्या जाणून घेणे अत्यावश्यक ठरते. १८९० साली बेल्जियम , सर्बिया , हंगेरी , ऑस्ट्रीया , रोमेनिया , चेकोल्सोव्हिया इ. राष्ट्रांनी एकत्र येऊन बाल्कन संघ तयार केला. १८९१ साली यामध्ये ग्रीसही समाविष्ट झाला. या सर्वांनी तुर्कस्तान वर हल्ला चढवला. या युद्धात तुर्कस्तानचा पराभव झाला. विजेत्या बाल्कन राष्ट्रांत नंतर मतभेद होऊन बाल्कन संघ फुटला. मुख्य म्हणजे बाल्कन प्रदेश हा तुर्कींच्या अधिपत्याखाली असणारा पुर्व युरोपचा प्रदेश होय. तुर्कांनी रशियाला बाल्कन प्रदेशात खास अधिकार दिले. या अधिकारांमुळे युरोपातील इतर राष्ट्रांच्या हितसंबंधांना धोका पोहोचणार होता. म्हणून राष्ट्रांनी युरोपियन राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या प्रमाणे ऑस्ट्रियाला बाल्कन प्रदेशातील बोसनिया व हार्जेगोनिया हे दोन प्रांत देऊन रशियाचा प्रभाव रोखण्याची जबाबदारी सोपवली होती. मुळात बोसनिया व होर्जेगोनिया हे दोन प्रांत सर्बियाचे. या प्रांतात सर्बियन नागरिकांची संख्या अधिक प्रमाणात होती. १८६१ मध्ये रशियाने युरोपातील आजारी माणूस अशी ओळख झालेल्या आटोमन साम्राज्यावर हल्ला केला. पण त्यात तो पराभूत झाला. त्यामुळे आटोमन साम्राज्य पर्यायाने तुर्कस्तान रशियाचा शत्रू झाला.  
जगात सर्वाधिक भूप्रदेश एकट्या रशियाकडे आहे. पण भौगोलिक परिस्थिती नुसार थंडीत रशियाची निम्याहुन अधिक बंदरे गोठली जातात. सर्वत्र बर्फ असल्याने रशियाचा व्यापार ठप्प होतो. त्यामुळे रशियाला भुमध्य समुद्राचे वेध लागले. या समुद्रातील एक जरी बेट रशियाकडे गेले असते तरी त्यांचा व्यापार सुरळीतपणे चालला असता. पण यामुळे इंग्लंड व फ्रान्स यांचे भुमध्य समुद्रातले पर्यायाने उत्तर आफ्रिकेतील संबंध धोक्यात येणार होते. भुमध्य समुद्रात रशियाला व्यापार करु दिले असते तर बाल्टिक समुद्रापासून ते भुमध्य समुद्रापर्यंतच्या सगळ्या किनारपट्ट्यांवर रशियन नौदलाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असते. शिवाय काळा समुद्रावर रशियाचा अंमल चालला असता तो वेगळाच.  अर्थातच क्रिमिया व युक्रेन हे अत्यंत सुरक्षित झाले असते. यांना हात लावने हिटलरला सुद्धा शक्य झाले नसते. ह्या घटना घडत असताना युरोपात एक घटना घडली जीने रशियाचे हे सर्व मनसुबे एका झटक्यात हाणून पाडले. तुर्की साम्राज्याला विरोध करण्यासाठी १८९० साली बल्गेरिया,  सर्बिया, ग्रीस , रोमानिया इ. राष्ट्रांनी बाल्कन संघ तयार करुन तुर्कस्थान सोबत १९१२ मध्ये युद्ध केले. यात बाल्कन राष्ट्रे विजयी झाली. पण प्रादेशिक वाटाघाटींमुळे बाल्कन संघ फुटला. बल्गेरिया ने ग्रीस , सर्बिया , तुर्कस्तान सोबत १९१३ मध्ये युद्ध पुकारले. यात बल्गेरियाचा पराभव झाला. या दोन युद्धांमुळे बाल्कन प्रदेशातील स्थिती अस्थिर झाली व कमालीची अशांतता पसरली. या दोन्ही विजयाने सर्बिया उन्मत झाला व त्यातूनच पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण घडून आले. 

To be continued..... 

Comments

Popular Posts