विसाव्या शतकातील घडामोडी.

               विसाव्या शतकातील घडामोडी 

                           भाग : - ०३ 

         दुसऱ्या महायुद्धाचा पुर्वाध आणि पॅरिस शांतता परिषद 


            दुसरे महायुद्ध म्हणजे इतिहासाच्या विराट मंचावरचे महातांडवच. दि. १ सप्टेंबर १९३९ रोजी हिटलरच्या फौजांनी वॉर्सा च्या रोखाने धाव घेताच या रणसंघर्षाला प्रारंभ झाला. आणि बरोबर  दि. २ सप्टेंबर १९४५ रोजी जपानच्या शरणागतीने त्याची सांगता केली. ०६ चाललेल्या या युद्धात तीन कोटी सैनिकांचे रक्त सांडले. या युद्धात ५७ देशांनी सहभाग घेतला. त्यात जर्मनी , ब्रिटन आणि रशिया या देशांची खरोखरच अपरिमित हानी झाली.  हिटलरने इशारा करताच नाझी जर्मनीचे सैन्य वॉर्साच्या रोखाने सैराट धावत सुटले. आणि छातीवर अणुबॉम्ब झेलणाऱ्या हिरोशिमाने तीचे भरतवाक्य लिहिले. तीन कोटी लोकांच्या रक्ताने भिजून या कहाणीमधली सारी पाने भिजून निघाली.    पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या शांतता बैठकीत जे करार झाले त्यातच दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली. म्हणून पहिल्या महायुद्धानंतर युरोपात काय काय घडले हेही जाणून घेणे तितकेच महत्वाचे ठरते. दि. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी फ्रान्स मधील कोंपेंनच्या अरण्यात एका आगगाडीत जर्मनीने पहिल्या महायुद्ध विरामाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नंतर १९१९ मध्ये पँरीस मधील व्हर्साय येथील आरसे महालात एक परीषद आयोजित केली गेली , तीच पँरीस शांतता परिषद.  या परिषदेत ०६ करार झाले. त्यातील मुख्य होता तो व्हर्सायचा करार. जो जर्मनीसाठी केला गेला होता. आणि याच करारात दुसऱ्या महायुद्धाची बीजे होती. या कराराने जर्मनीचे सैन्य ५० % टक्यांपेक्षाही कमी होणार होते. पहिल्या महायुद्धामुळे ऑस्ट्रो- हंगेरीयन साम्राज्याचे विघटन झाले. आटोमन साम्राज्य लयास गेले. परंतू जर्मनीच्या अस्तित्वाला मुळीच धक्का पोहोचला नाही तो या करारामुळेच. व्हर्सायच्या अपमानास्पद करारावर स्वाक्षरी केल्यामुळे जर्मन जनतेत असंतोष निर्माण झाला. त्यापासून जर्मन सरकारचे रक्षण करण्याची जबाबदारी अँग्लो - फ्रेंचांवरच येऊन पडली. रशियातील नवजात बोल्शेव्हिक राजवटीचे धक्के लवकरच जर्मनीला बसू लागतील हा संभवही अँग्लो - फ्रेंचांना दृष्टीआड करता येण्यासारखा नव्हता. बोल्शेव्हिझमच्या आक्रमणातून जर्मनीला वाचविण्याची काळजीही त्यांनाच वहायची होती.  याचा परिणाम असा झाला की , रणांगणावर जबरदस्त नामुष्की स्वीकारुनही बिस्मार्कच्या प्रयत्नांमुळे १८७१ मध्ये एकसंध झालेल्या जर्मनीला जीवनदान मिळाले.
११ नोव्हेंबर १९१८ रोजी पहिले महायुद्ध समाप्त झाले. जसा प्रत्येक नव्या पिढीला जुन्या पिढीचा वारसा असतो , तसा दुसऱ्या महायुद्धाला व्हर्सायचा वारसा होता. व्हर्सायच्या अपमानास्पद करारावर जर्मनीने स्वाक्षरी केली त्यामुळे जर्मन जनतेत असंतोष निर्माण झाला. पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धात बरेच साम्य दिसत असले तरी त्यातील एक महत्त्वाचा फरक ध्यानात घ्यायला हवा. पहिल्या महायुद्धानंतर युरोपामधील जुन्या साम्राज्यसत्ता कोसळल्या आणि अनेक नवी राष्ट्रे उदयाला आली. दुसऱ्या महायुद्धानंतर तसे काही घडले नाही.  अगदी तपशीलवार हिशेब मांडायचा तर दुसऱ्या महायुद्धाने युरोपाच्या नकाशावरील एस्थोनिया , लँटिव्हिया , आणि लिथुआनिया ही तीन चिमुकली राष्ट्रेच तेवढी गिळंकृत केली. थोडक्यात पहिले महायुद्ध युरोपाचा नवा नकाशा आखण्यासाठी खेळले गेले , तर हा नवा नकाशा जर्मनीने फाडता कामा नये यासाठी दुसऱ्या महायुद्धाचा खटाटोप करण्यात आला.  पहिल्या महायुद्धात जर्मनी आणि रशिया ही दोन्ही राष्ट्रे पराभूत झाली असली तरी या दोघांच्याही पराभवाचे स्वरूप वेगळे होते. ०६ नोव्हेंबर १९१७ रोजी रशियात राज्यक्रांती झाली. यामुळे रशियाने महायुद्धामधून माघार घेतली. या क्रांतीचे फलित पचविण्यासाठी क्रांतीच्या सुत्रधारांना युरोपीय राजकारणातून आपले अंग काढून घ्यावेसे वाटले आणि त्यामुळे रशियाचे काय करायचे हा प्रश्न आपोआप मागे पडला. जर्मनीची गोष्ट तशी नव्हती. पराभवानंतरही जर्मनीच्या युद्धपुर्व स्वरूपाला तडा गेलेला नव्हता. जर्मनी संपुर्णतया शरण येण्यापूर्वीच विजेत्या राष्ट्रांनी तिच्याशी युद्धविरामाचा करार केला होता. त्यामुळे प्रत्यक्ष महायुद्ध संपले तेव्हा, जर्मन सेना रणांगणावर पराभूत झाली असली तरी तिचा पुर्णपणे धुव्वा उडालेला नव्हता किंवा ती पुर्णतया नष्टही झालेली नव्हती. याउलट विजय मिळवूनही ब्रिटिश आणि फ्रेंच सेनेची दमछाक झालेली होती. युद्धविरामाचा करार करताना केवळ चकमकी थांबाव्यात एवढाच या कराराचा मर्यादित उद्देश नव्हता.  जर्मनीची इच्छा असली तरीदेखील तिला पुन्हा लढाईला प्रारंभ करता येऊ नये या हेतूनेच तो करार करण्यात आला. १९१९ मध्ये युद्धोत्तर जगाचे प्रश्न सोडवण्याच्या कार्यात सर्व राष्ट्रे मग्न झाली आणि जर्मन प्रश्न आपोआपच मागे पडला. 

 To be continued.......

Comments

Popular Posts