विसाव्या शतकातील घडामोडी.

           विसाव्या शतकातील घडामोडी 
                           भाग : - ०२ 
                        पहिले महायुद्ध 
      इ.स.दि. २८ जुलै १९१४ ते ११ नोव्हेंबर १९१८ 

   १९१२ आणि १९१३ दोन्ही वर्ष युरोपात बाल्कन राष्ट्रांचे युद्ध झाले. दोन्ही युद्धात मिळालेल्या विजयाने सर्बिया उन्मत झाला. तो आता ऑस्ट्रियाकडे बोसनिया व हार्जेगोनिया यांच्यासाठी भांडू लागला. हे सर्व होता होता १९१४ साल उजाडले. आता मात्र ऑस्ट्रिया आणि सर्बिया यांच्यातला संघर्ष पराकोटीला पोहोचला होता. जसे की प्रत्येक घटनेला काही मुख्य कारणे आणि एक तत्कालीन कारण असते. तसेच पहिल्या महायुद्धाच्या वेळेसही होते. १८७१ पासून ते १९१४ साला पर्यंत युरोपातील घटनांमुळे युरोप दारुगोळ्याचे कोठारच बनला  होता. फक्त आवश्यकता होती ती एका ठिणगीची. आणि ती ठिणगी पडली ती इ.स.दि. २८ जून १९१४ रोजी. 
   २८ जून १९१४.   बोसनिया ची राजधानी साराजोव्हो येथे ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्युक फ्रांन्सिस फर्डिनांड हा एका कार्यक्रमानिमित्त आला होता. हा कार्यक्रम संपायच्या काही वेळ आगोदर काही सर्बियन गुंड या राजपुत्राच्या गाडीत लपून बसले. कार्यक्रम आटोपून युवराज गाडीत बसला आणि  तेवढ्यात त्या गुंडांनी  त्याची आणि त्याच्या बायकोची गोळ्या घालून हत्या केली.  या घटनेनंतर ऑस्ट्रिया व सर्बिया यांच्या संघर्षाने पेट घेतला. या घटनेच्या एक महिन्यानंतर म्हणजे इ.स.दि. २८ जुलै १९१४ रोजी जर्मनीने बेल्जियमवर  हल्ला केला. युरोपात पहिल्या महायुद्धास सुरुवात झाली. नंतर इ.स.दि. ०१ ऑगस्ट १९१४ रोजी जर्मनीने रशियावर हल्ला करून त्यास ही युद्धात ओढले. नंतर इ.स.दि. ०३ ऑगस्ट १९१४ रोजी इंग्लंड व फ्रान्स यांनी जर्मनी विरुद्ध युद्धाची घोषणा केली. आता या रणसंघर्षाने खऱ्या अर्थाने पेट घेतला. ऑगस्ट १९१७ सालापर्यंत जर्मनी आघाडीवर होती. नुकत्याच शोधलेल्या व अत्यंत नवीन अशा जर्मन पाणबुड्या हाहाकार माजवत होत्या. महायुद्ध सुरू झाले असले तरीपण अमेरिका व इंग्लंड यांच्यातील व्यापार मात्र चालू होता. एक गोष्ट मात्र खरी की दोन्ही महायुद्धाच्या वेळेस जर्मनीच्या नेत्यांनी मालवाहतूक करणाऱ्या जहाजांवरहल्ले करु नये असा आदेश दिलेला आढळतो. ह्या घटना होत असताना एक घटना मात्र वाईट घडली. 
    इ.स.दि. ०७ मे १९१५ या दिवशी इंग्लंडच्या RMS Lusitania ह्या जहाजाला जर्मनीच्या U - 20 ह्या पाणबुडीने जलसमाधी दिली. जहाजावरील सर्वच सुमारे ११९८ जण मृत्यूमुखी पडले. यात २५० अमेरिकन नागरिक होते.  ही घटना पश्चिम युरोपातील सेल्टिक समुद्रात आर्यलंड जवळ घडली. मुळात हे जहाज २५० अमेरिकन नागरिक व काही माल घेऊन लंडंन वरुन न्यु यॉर्क ला चालले होते. जहाजावर झेंडा हा इंग्लंडचा होता. त्यामुळे जर्मन पाणबुड्यांनी आदेश न जुमानता हल्ला केला. व जहाजाला जलसमाधी दिली. याच सुमारास रशियात मात्र झार ( रशियन राजा ) विरुद्ध जनमतात असंतोष निर्माण झाला. इ.स.दि. १४ ऑगस्ट १९१७ या दिवशी रशियाने महायुद्धातुन माघार घेतली. तोपर्यंत रशियन राज्यक्रांतीचे मुख्य नेते लेनिन व स्टॅलिन यांनी संपूर्ण रशियन जनमत आपल्या बाजूला वळवले. इ.स.दि. ०६ नोव्हेंबर १९१७ या दिवशी रशियात राज्यक्रांती होऊन नवीन बाल्शेव्हिक सरकार स्थापन झाले. आणि दि. ०७ नोव्हेंबर रोजी लेनिन याने बाल्शेव्हिक रशियाचा पहिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. १९१७ पर्यंत जे पारडे जर्मनीकडे होते ते आता इंग्लंड व फ्रान्स यांच्या बाजूने झुकले. कारण युद्धात जपान व अमेरिका यांनी उडी घेतली होती. एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे इटली.  १९१३ च्या नोव्हेंबर मध्ये इटलीने जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरण्याचे आश्वासन दिले. तसा तो उतरलाही. परंतु सप्टेंबर १९१५ मध्ये इटलीने पलटी मारली व दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धाला उभा ठाकला. अमेरिका युद्धात आल्यामुळें दोस्त राष्ट्रांची ताकद वाढली. एक एक करत सर्वांनी आपला पराभव मान्य केला. अखेर तो दिवस उजाडला ज्याने दुसऱ्या महायुद्धाच्या रक्तरंजीत इतिहासाचे मुखपृष्ठ लिहिले . ११ नोव्हेंबर १९१८. फ्रान्स मधील कोपेंनच्या जंगलात एका आगगाडीत फ्रेंच नेत्यांनी युद्ध विरामाच्या करारावर  पराभूत जर्मनीची स्वाक्षरी घेतली. हे घटना घडली तरी जर्मनी मैदानावर पराभूत झाली नव्हती. यानंतर युद्धोत्तर जगाचा विचार करण्यासाठी आणि पुन्हा असे युद्ध होऊ नये यासाठी इ.स.दि. १८ जानेवारी १९१९ या दिवशी पॅरिस येथील व्हर्सायच्या आरसे महालात शांतता परिषद आयोजित केली. या परिषदेत जर्मनीवर अन्यायकारक तह लादण्यात आले.  तर जगातील खास करून प्रशांत महासागरातील मोठी नाविक सत्ता म्हणून जपानचा उदय झाला. १९३२ पासून या जपानी नाविक सत्तेला अमेरिकेकडून मात्र हादरे बसू लागले. 

To be continued......

Comments

Popular Posts