विसाव्या शतकातील घडामोडी.

 विसाव्या शतकातील घडामोडी 

भाग :- ०४ 

रशियन राज्यक्रांती  

०६ आणि ०७ नोव्हेंबर १९१७ ह्या दोन दिवसांना रशियाच्या सोबतच जगाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
कारण या घटनेत जगाच्या इतिहासाला कलाटणी देण्याची क्षमता होती. जगाच्या इतिहासात १७८९ सालची फ्रेंच राज्यक्रांती आणि १९१७ सालची रशियन राज्यक्रांती या घटना महत्त्वाच्या मानल्या जातात. 

२८ जुलै १९१४ रोजी पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. ऑगस्ट १९१७ मध्ये महायुद्धातुन रशियाने माघार घेतली. 
कारण विलासी व अकार्यक्षम झार मुळे रशिया दुबळा झाला होता.  १९०४-०५ च्या वेेेळेेस रशिया युुद्धात हरला होता. 

 रशियन राज्यक्रांतीची कारणे 

०१) सामाजिक कारणे 
  २० व्या शतकात रशिया मध्ययुुुगीन संस्थांच्या प्रभावाखाली होता. शेतकरी वर्गाचा भरणा समाजात अधिक प्रमाणात होता. उमराव व सामान्य रयत यांच्यात जमीन आसमानाचे अंतर होते. उमराव चैनी व विलासी जीवन जगत होते. रयतेची बंडे पाशवी सत्तेच्या साहाय्याने मोडून काढली जात असत. मध्यमवर्ग अभावानेच होता. रशियात औद्योगिकीकरण उशिरा झाले. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत तेथे औद्योगिकीकरण नव्हते. 

०२) आर्थिक कारणे 
 रशिया आर्थिकदृष्ट्या मागासलेला होता यातच क्रांतीची बीजे आपल्याला आढळून येतात. त्यामुळे रशियात सर्वसाधारण जनतेत कमालीचे दारिद्रय , दु:ख व पिळवणूक यांचे दर्शन आपल्याला घडून येते. क्रांतीपुर्व रशियात भ्रष्टाचारी राज्यकारभार , हुकूमशाही राज्यपद्धती , व पिळवणूक करणारी संस्था यांचे प्राबल्य होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता व सैन्य दोघेही असमाधानी होते. 

०३) रशिया - जपान युद्ध ( १९०४-०५)  
झार निकोलस दुसरा याच्या साम्राज्यवादी धोरणांमुळे १९०४-०५ ला जपान व रशिया यांच्यात युद्ध झाले. यावेळी रशियन जनतेला युद्धात  रस नव्हता. त्यातच चिमुकल्या जपानने आपल्या राक्षसप्राय देशाला पराभूत केले यामुळे रशियन जनतेत झार विरुद्ध मोठा असंतोष निर्माण झाला. 

०४) १९०५ ची क्रांती  
२२ जानेवारी १९०५ रोजी सेंट पिटर्सबर्ग येथील राजवाड्यासमोर जमलेल्या व सुधारणांची मागणी करणाऱ्या जनसमुदायावर झारने लष्कराकरवी हल्ला करून प्रचंड मोठी कत्तल घडवून आणली ही वार्ता सर्वत्र पसरताच शेतकरी , कामगार , मध्यमवर्गीय लोक खवळून उठले. रशियात सर्वत्र दंगे , संप झाले. यावेळेस झारने थोडे नमते घेऊन लोकप्रतिनिधींची एक सभा बोलावली. पण त्यांचे ऐक्य न झाल्याने त्याने ड्युमा कमकुवत केली व पुन्हा तो अनियंत्रित सत्ताधीश झाला. 

राज्यक्रांती 

 १९१७ च्या सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये रशिया महायुद्धातुन माघारी फिरला. त्यानंतर सर्वत्र झार विरोधी आंदोलने सुरू झाली. बाल्शेव्हिक पक्षाचा नेता म्हणून लेनिन यास निवडण्यात आले. ऑक्टोबर च्या मध्यानंतर संपूर्ण रशियात झार विरोधी प्रचार , आंदोलने संप पुकारण्यात आले. लेनिन वर जर्मन विचारवंत कार्ल मार्क्सच्या दास कँपिटल या ग्रंथाचा  प्रभाव होता. 
त्याच्या साम्यवादी विचारसरणीने तो पुर्णपणे भारावून गेला. लेनिनने झार ला मिळणारा आर्थिक पुरवठा बंद केला. त्यामुळे ज्या सरकारी  तिजोरीत अधिच  खडखडाट निर्माण झाला होता ती पुर्णतः रिकामी झाली. रशियातील सर्व व्यावसायिकांनी लेनिनला मदत करायला सुरुवात केली. शेवटी दि. ०६ नोव्हेंबर १९१७ या दिवशी मॉस्को येथील मुख्य राजवाड्यात झारने आत्मसमर्पण केले. रशियात सुमारे ११ व्या शतकापासून चालत आलेल्या झारशाहीचा अखेर शेवट झाला. ११ शतकात झारशाहीची स्थापना झाली. सोळाव्या- सतराव्या शतकापर्यंत झार दबदबा कायम राहीला. मात्र तेथून पुढचे झार आळशी व विलासी होत गेले. दि. ०७ नोव्हेंबर १९१७ रोजी लेनिन साम्यवादी रशियाचा पहिला अध्यक्ष बनला. 
लेनिन व स्टॅलिन यांनी रशियाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. १९२२-२३ दरम्यान लेनिनने रशियात सर्वप्रथम पंचवार्षिक योजना सुरू केल्या. नंतर त्या चीन व भारत यांनी स्वीकारल्या. १९२५ साली लेनिनचे निधन झाले. त्यानंतर स्टॅलिन त्याचा उत्तराधिकारी म्हणून रशियाचा अध्यक्ष झाला. स्टॅलिनने प्रचंड प्रमाणात रशियाचा विकास घडवून आणला. त्याच्याच काळात रशिया महासत्ता बनला. १९४५ साली दुसरे महायुद्ध संपले व शितयुद्धाची सुरुवात झाली. १९५२-५३ मध्ये स्टॅलिनचे निधन झाले. 

क्रमशः 

Comments

Popular Posts