कृष्ण मृत्तीका

रहस्य कृष्ण मृत्तीकेचे 

   सन १७०२. 
 औरंगजेब मराठ्यांना पराभूत करण्यासाठी चारही बाजूंनी प्रयत्न करु लागला. त्याच्यासाठी एक आशेचा किरण होता की नुकतेच छत्रपती राजाराम महाराजांचे निधन झाले होते. मराठ्यांचा राज्यकारभार एक स्त्री आपल्या ५ वर्षाच्या मुलाच्या नावाने पहात होती. तीचे नाव होते महाराणी ताराबाई.  स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांची ती सुकन्या. ही गोष्ट आहे १७०२ सालची. जेव्हा औरंगजेबाने कोंठाणा म्हणजेच सिंहगडाला वेढा दिला होता. तेव्हा पुणे प्रांताचे सुभेदार होते बाळाजी विश्वनाथ भट. बाळाजी पंतांनी आंबाजी पंत पुरंदरे व काशी विश्वनाथ यांना एक पत्र लिहिले. ज्यात ते कृष्ण मृत्तीकेचा उल्लेख करतात. कृष्ण मृत्तीका म्हणजे काय ? 
कृष्ण म्हणजे काळी माती का ?.  बाळाजी विश्वनाथ काळ्या मातीविषयी का लिहितील. गडावर काळ्या मातीचे काय काम. तर कळी माती म्हणजे तोफगोळ्याचे दारु.किंवा बंदुकीची दारू.  गडावरचा दारुगोळा संपत असावा.  म्हणून बाळाजी पंत दारुगोळ्याविषयी लिहीत आहे. होता होईल तितक्या लवकर कृष्ण मृत्तीका गडावर पोहचविण्यासाठी सांगता आहेत.
हे पत्र ३० ऑगस्ट १७०२ सालचे आहे.. 
सोबत पत्र दिले आहे. 

संदर्भ : - ऐतिहासिक पत्रबोध 
पुरंदरे दफ्तर खंड ०१ लेखांक क्र. २१ 
©️  under copyright act 1956 

Comments

Popular Posts